35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद

मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्याच्या प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. प्रत्येक पक्षाने अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या हेतून प्रचारसभांचा धुरळा उडवला होता. काहींनी दारोदार जाऊन प्रचारही केला. कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचाच यात समावेश पाहायला मिळाला. राज्यात निवडणुकीच्या तिस-या टप्प्याच्या निमित्ताने रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथें मतदान पार पडणार आहे. याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

अनिवडणूक प्रक्रिया लक्षात घेता मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार जिल्हाधिका-यांच्या वतीने हे निर्देश देण्यात आल्यामुळे आता तिस-या टप्प्यातील मतदानादरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी हा निर्णय घेतला असून, गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिका-यांचा आदेश असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारपेठा बंद राहणार म्हणजे किराणा, भाजीपाला मिळणार नाही का? असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला. पण, ही चिंतेची बाब ठरणार नसून, भाजीविक्रेते आणि धान्यदुकाने मात्र ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR