30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंच्या समारोप सभेत रोहित पवार भावूक

सुप्रिया सुळेंच्या समारोप सभेत रोहित पवार भावूक

पुणे : राज्यात तिस-या टप्प्याचे मतदान मंगळवार, ७ मे रोजी होणार आहे. या तिस-या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. आज झालेल्या सभेत अजित पवार विरुद्ध शरद पवार गटाचा सामना दिसून आला आहे. एवढेच नाही तर सभेत रोहित पवार भावूक झाल्याचं दिसून आले. त्यावर त्यांना चिमटा काढत टोमना मारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत प्रचाराची सांगता करताना आमदार रोहित पवार, सुप्रिया सुळे यांना लक्ष केले. शरद पवार यांच्या सांगता सभेमध्ये रोहित पवार यांचे भाषण झाले होते. या भाषणादरम्यान रोहित पवार भावनिक झाल्याचे दिसून आले.

रोहित पवारांची उडवली खिल्ली
आज झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्यानंतर डोळ्यातून पाणी काढले. मी पण पाणी काढून दाखवतो. मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. हा रडीचा डाव झाला. तुम्ही कामाच्या जोरावार मते मागा, आपले खणखणीत नाणे दाखवा, असं म्हणत अजित पवारांनी आमदार रोहित पवारांचा समाचार घेतला.

सुप्रिया सुळेंवर टीका
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली. सुप्रिया सुळे यांनी माझा नवरा माझा पर्स सांभाळत नाही, अशा स्वरूपाची टिका काही दिवसांपूर्वी केली होती. त्याला अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलं. ते म्हणाले महिला लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा पर्स घेऊन जातो का? मला तर एकेकाला अशी उत्तर देता येईल की, पळता भुई थोडी होईल. मी म्हणतो आपलीच भावंडे आहेत, जाऊ द्या, बहीण आहे जाऊ द्या, पण हे जरा जास्तच व्हायला लागले हे चालणार नाही, असा इशारा त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR