नवी दिल्ली : सोमवारपासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शनिवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. संसदेच्या ग्रंथालय भवनात सकाळी ११ वाजल्यापासून ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रल्हाल जोशी हे होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या १९ दिवसांत अनेक प्रलंबित विधेयके मंजूर होऊ शकतात.
सध्या संसदेसमोर ३७ विधेयके प्रलंबित आहेत, ज्यात आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्यातील बदल यासारख्या काही महत्त्वाच्या विधेयकांचाही समावेश आहे. याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांशी संबंधित विधेयकांवरही या हिवाळी अधिवेशनात चर्चा होऊ शकते.