20.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमुख्य बातम्याचारही राज्यांचे कल हाती

चारही राज्यांचे कल हाती

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांचे निवडणूक कल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. २०२४ मध्ये होणा-या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कांटे की टक्कर सुरू होती. सकाळी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठत मुसंडी मारली आहेत तर तेलंगणात काँग्रेसने बहुमत सिध्द केले आहे.

राजस्थानमध्ये भाजपला आघाडी
राजस्थानमध्ये विधासभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. या ठिकाणी यंदाही पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा दिसत आहे आहे. ११३ जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे

मध्य प्रदेशात भाजपची सत्ता
मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी ७६.२२ टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. भाजपने १६१ जागांवर आघाडी घेतली आहे.

छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर
छत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये २०१८ नंतर १५ वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस दिसत होती. भाजप ५३ जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणात काँग्रेसची बल्ले बल्ले
तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के. चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. काँग्रेसने मात्र चांगली मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR