24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुद्धात अमेरिका जळून जाईल : इराण

युद्धात अमेरिका जळून जाईल : इराण

तेहरान : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीसह लेबनानमधील दहशतवादी संघटनांवरही जबरदस्त बॉम्बिंग सुरू आहे. याच बरोबर, दोन आघाड्यांवर युद्ध लढत असलेल्या इस्रायलला आतापर्यंत इराण केवळ इशाराच देत होता. मात्र आता त्याने थेट युद्धात उडी घेण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. इराणने, इस्रायलची ढाल बनून उभ्या असलेल्या अमेरिकेलाही युद्धाच्या आगीत जाळण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रात अमेरिकन लष्कराची तैनाती वाढत आहे. याच बरोबर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आधीच म्हटले आहे की, इराण अथवा त्याच्या समर्थक दहशतवादी संघटनांनी कुठल्याही अमेरिकन नागरिकावर हल्ला केला, तर आपल्या लोकांचे संरक्षण कसे करावे? हे अमेरिकेला माहीत आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या २१ दिवसांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास ९ हजार लोक मारले गेले आहेत. हे युद्ध आता आणखी रौद्र रूप धारण करण्याची चिन्ह आहेत. आता इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करायला सुरुवात केली आहे. इस्रायल त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देणार आहे. इस्रायलचे पोलीसमंत्री इतामार बेन ग्विर यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्कलोनमधील नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटली आहेत. तसेच, युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

अमेरिकेचा इशारा
अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको आहे. मात्र, इस्रायलजवळ पाठवण्यात आलेली अमेरिकन विमाने आणि लष्करी जहाजांची तैनाती पाहूनच इराणने संकेत समजून घ्यायला हवा असे इशारा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रात दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR