27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्रतिहेरी लढतीचा अमित ठाकरेंना फायदा!

तिहेरी लढतीचा अमित ठाकरेंना फायदा!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेकडून सदा सरवणकर, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे महेश सावंत इथे रिंगणात आहेत.

मूळ शिवसेना रुजली ती दादर-माहीममध्येच. सेनेच्या या बालेकिल्ल्यात विद्यमान आमदार असलेल्या सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावी व मनसेला पाठिंबा द्यावा, यासाठी विविध स्तरांवर हालचाली झाल्या. मात्र, माघार घेण्याची तयारी असलेल्या सरवणकर यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली, त्यानंतर त्यांनीही रिंगणात पाय रोवून राहण्याचा निर्धार पक्का केला. अशात आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

माहीममध्ये दुहेरी लढत झाली असती, तर शिवसेनेची सर्व मते ठाकरेंच्या उमेदवाराला गेली असती, पण तिहेरी लढतीत अमित ठाकरेंना फायदा होईल, असा दावाच सरवणकरांनी केला.

माहीममध्ये ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला त्या अंदाजानुसार, अमित ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजे ५४ टक्के मतं मिळाली आहेत. महेश सावंत यांना ३२ टक्के मतदारांनी कौल दर्शवला आहे. सदा सरवणकर यांना सर्वात कमी म्हणजे १२ टक्के मतं मिळाली आहेत. इतरांना २ टक्के पसंती आहे. ५ हजार ९५२ जणांनी आपले मत नोंदवले आहे. अर्थात हा एक अंदाज आहे.

अमित ठाकरे पराभूत होणार : राऊतांचे भाकीत
एकनाथ शिंदेंनी अमित ठाकरेंच्या पराभवासाठी कामाख्या देवीला साकडं घातलं असेल, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आपला काटा काढतील अशी श्ािंदेंना भिती आहे. त्या भिती पोटीच एकनाथ शिंदे सध्या पछाडलेत. प्रकाश आंबेडकरांचाही अकोल्यात पराभव झाला हे राज ठाकरेंनी विसरू नये, अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहिमला होईल, हे स्पष्ट दिसतंय. भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठीच राज ठाकरे घराबाहेर पडलेत. माहिमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतरत्र मदत होतेय’, असं राऊतांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR