24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकेजरीवालांविरोधात घातपाताचा कट रचला जातोय

केजरीवालांविरोधात घातपाताचा कट रचला जातोय

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आणलेल्या अबकारी धोरण घोटाळा आणि कथित मद्य घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन सध्या दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्री आणि नेते मंडळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत.
त्यातच ईडीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

मद्य घोटाळाप्रकरणी खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सुनावणीसाठी नेताना बाजूला उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे त्यांना केवळ अटकच होणार नाही तर त्यांच्याविरोधात घातपात करण्याचा मोठा डाव आखला जात आहे, असा खळबळजनक आरोपच त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR