29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमनोरंजनअनुराधा पौडवाल भाजपमध्ये!

अनुराधा पौडवाल भाजपमध्ये!

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आज त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली.

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याआधी अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला आहे. पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पौडवाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची गाणे आजही लोकांचा पसंतीस पडतात. त्यांची काही भक्तीगीते खूप लोकप्रिय आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR