31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेत बीआरएसची महाराष्ट्रातून माघार?

लोकसभेत बीआरएसची महाराष्ट्रातून माघार?

पक्षाचे कामही थांबले, नागपूरच्या कार्यालयाला कुलूप

नागपूर : लोकसभा निवडणूक जवळ येत असून राज्यात आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री करून राजकीय वातावरण तापवणा-या बीआरएस पक्षाने मात्र महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारण याबाबत पक्षाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून, राज्यातील बीआरएस पक्षाचे काम थांबले असल्याची प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे विदर्भ संघटक चरण वाघमारे यांनी दिली आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी दमदार एन्ट्री केली होती. मात्र, तेलंगणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाचा पराभव झाल्यानंतर, महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाची सुरू असलेली घोडदौड संथ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे बीआरएस पक्षाचे राज्यातील एकमेव नागपूर येथील कार्यालय देखील बंद पडले आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने इतर पक्षांची साथ सोडून बीआरएसमध्ये जाणा-या नेत्यांची कोंडी झाली आहे.

महाराष्ट्रातील पक्ष चालवायचा की नाही?
दरम्यान याबाबत बोलताना बीआरएस पक्षाचे विदर्भ संघटक चरण वाघमारे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रातील बीआरएसचे काम थांबले, बंद झालेले आहे. तेलंगणातील सरकार गेल्यानंतरही महाराष्ट्रातील पक्षाचे काम थांबणार नाही, ही अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील पक्ष चालवायचा की नाही, याबाबत आम्हाला त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. महाराष्ट्रातील पहिले कार्यालय असलेले नागपूर कार्यालयाच्या चाव्या जमा करायला सांगितल्यात. महाराष्ट्रातील बीआरएसचे काम थांबलेले आहे, बंद झालेले आहे, असे वाघमारे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR