16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

पोर्शे कार अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन् मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यासाठीचा अर्ज सोमवारी (दि. २५) न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हा अर्ज केला आहे. मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल(दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वत:चे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) यांच्यावर खटला सुरू करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.

तर आशिष मित्तलला रक्त देण्यास सांगणा-या अरुणकुमार देवनाथ सिंग यांच्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे. दरम्यान, कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर ३१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यासह पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाख केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR