35 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeराष्ट्रीयतेलंगणाच्या आदिलाबाद एअरपोर्टला मंजूरी

तेलंगणाच्या आदिलाबाद एअरपोर्टला मंजूरी

राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना लिहीले

आदिलाबाद : केंद्र सरकारने वारंगलच्या ममनूरमध्ये विमानतळाला मंजूरी दिली असतानाच आता तेलंगणात आणखी एक विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय वायू सेनेने आदिलाबाद येथे विमानतळ उभारण्यास तत्वत: मंजूरी दिली आहे. हा निर्णय झाल्यावर ममनूरसह हे राज्याचे तिसरे विमानतळ ठरेल असे केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.

किशन रेड्डी यांनी नागरी विमान तळाला मंजूरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरिक विमानन मंत्री राम मोहन नायडू यांना धन्यवाद म्हटले आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण(एएआय) अलिकडेच ममनून येथे विमानतळाचा विकास करण्यास मंजूरी दिली आहे. निजामच्या कार्यकाळात जेव्हा आसफ जाही वंशाने १७२४ ते १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थानात राज्य केले, तेव्हा ममनूर आणि आदिलाबाद हवाई धावपट्ट्या चालू होत्या.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार
क्षेत्रीय संपर्क योजना उड्डाणांतर्गत सुमारे ६२० मार्गांपैकी सध्या हैदराबाद येथे सुमारे ६० विमान मार्ग सुरु आहेत. नवीन विमान तळाच्या उभारणीने आणखीन उड्डाण मार्ग उपलब्ध होतील. केंद्र सरकार हवाई भाडे कमी करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आदिलाबाद वायू सेना प्रशिक्षण केंद्रातून स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. आदिलाबादच्या लोकांचे खूप काळापूर्वीचे स्वप्न सत्यात येणार आहे. कारण आदिलाबाद येथे वायू सेनेची धावपट्टी नागरि विमानन सेवांना सुरु करण्यास तयार असल्याचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून कळवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR