27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयचार राज्यांत पंतप्रधानांनी घेतल्या सुमारे ४० सभा

चार राज्यांत पंतप्रधानांनी घेतल्या सुमारे ४० सभा

जवळपास सर्व भागात पोहोचण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग नोंदवला व आपल्या पक्षाचा प्रचार केला. या निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी सुमारे ४० निवडणूक सभांना संबोधित केले आणि काही ठिकाणी रोड शोही केले. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी सर्वाधिक १४ निवडणूक सभांना संबोधित केले तर मिझोराममध्ये ते कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी आपली पहिली रॅली छत्तीसगडमध्ये घेतली. यानंतर त्यांनी दुर्ग, विश्रामपूर, मुंगेली आणि महासमुंद येथे निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले. काँग्रेसशासित छत्तीसगडमधील ९० जागांपैकी २० जागांसाठी ७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान झाले तर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ७० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तसेच पंतप्रधानांनी तेलंगणात एकूण आठ निवडणूक रॅलींना संबोधित केले आणि हैदराबादमध्ये रोड शो केला आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यासह सात खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे, शिवराज सिंह चौहान यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले नाही. याउलट काँग्रेसने कमलनाथ यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले.

गेल्या महिन्यात ९ ऑक्टोबरला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराममध्ये मतदान पूर्ण झाले आहे. तेलंगणामध्ये ३० डिसेंबरला मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला पाच राज्यांतील मतमोजणीनंतर कोणत्या राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कुठे कोणाची जादू चालली, हे स्पष्ट होईल.

राजस्थानमध्ये १२ जाहीर सभा
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी एकूण १२ जाहीर सभांना संबोधित केले. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलते. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही परंपरा बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधानांनी जयपूर आणि बिकानेरमध्ये दोन रोड शोही केले. राज्यातील २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले.

मध्य प्रदेशमध्ये १४ सार्वजनिक सभा
मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधानांनी एकूण १४ सार्वजनिक सभांना संबोधित केले आणि इंदूरमध्ये रोड शो केला. या राज्यातील त्यांची पहिली सभा रतलाम येथे झाली. त्यांनी सिवनी, खांडवा, सिधी, दमोह, गुना, मुरैना, सतना, छतरपूर, नीमच, बरवानी, बैतूल, शाजापूर आणि झाबुआ येथे निवडणूक रॅलींना संबोधित करून राज्याच्या जवळपास सर्व भागात पोहोचण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR