38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी आमचीच

राष्ट्रवादी आमचीच

नार्वेकरांच्या नोटिसीला अजित पवार गटाचे २६० पानी उत्तर

मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळात दाखल केली. त्यानंतर याबाबत म्हणणे मांडण्यासाठी विधिमंडळाने शरद पवार आणि अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. अजित पवार गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधिमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे.

राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा ठोकला होता. राष्ट्रवादी आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला होता. त्याला अजित पवार गटाने उत्तर दिले आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नोटिसीला उत्तर देताना अजित पवार गटाने भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यामुळे अध्यक्ष यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली आहे.

शरद पवार गटाच्या आमदारांचे १० पानी उत्तर

विधिमंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. आमदार अपात्रतेच्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. शरद पवार गटाच्या आमदारांनी नोटिसीला १० पानी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR