27.7 C
Latur
Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रभरड धान्यापासून तब्बल ६,७५० किलोंची खिचडी होणार तयार

भरड धान्यापासून तब्बल ६,७५० किलोंची खिचडी होणार तयार

अनोखा जागतिक विक्रम

चंद्रपूर : चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पोषक तत्त्वे असलेले मिलेट्स म्हणजेच भरड धान्याचे महत्त्व अनोखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल २०२३ हे वर्ष ‘मिलेट्स वर्ष’ जाहीर केले आहे. या मिलेट्स पासून अनोखी खिचडी तयार केली जाणार आहे. चंद्रपूर शहरात आयोजित चांदा अ‍ॅग्रो २०२४ मध्ये उद्या प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे ऊर्जा देणारी भरड धान्याची तब्बल ६,७५० किलोची खिचडी तयार करणार आहेत. याआधीचा विक्रम एप्रिल २०२२ मध्ये भगरीपासून ६,००० किलोची खिचडी तयार करण्याचा आहे.

मिलेट्स म्हणजे भरड धान्य हे पोषक म्हणून परंपरेनुसार आपल्याकडे आहारात वापरले जाते. परंतु हल्लीच्या बदलत्या आहार-विहाराच्या सवयींमुळे फास्ट फूडकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे पुन्हा भरड धान्याकडे लक्ष जाण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सूचनेवरून भारताने साल २०२३ मिलेट्स वर्ष म्हणून जाहीर केले होते.

प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी भरड धान्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरांत १२ मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे आतापर्यंत विष्णू मनोहर यांनी नागपूर, नाशिक, संभाजीनगर येथे मिलेट्सचे विविध पदार्थ तयार केले आहेत. याआधी नाशिक येथे एप्रिल २०२२ मध्ये भगरीपासून ६,००० किलोची खचडी तयार करण्याचा विक्रम झाला होता.

आता चंद्रपुरातील चांदा अ‍ॅग्रो २०२४ मध्ये उद्या सकाळपासून चांदा ग्राऊंडवर मिलेट्सची खिचडी बनविण्यास सुरुवात केली जाणार आहे. एका प्रचंड मोठ्या कढईत ही खिचडी तयार केली जाणार आहे. या खिचडीसाठी विविध पदार्थांची गरज लागणार असून त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR