37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी

पाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी

पाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी (वय ६८) यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांमध्ये शनिवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले.

पाकिस्तानच्या १४ व्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी चारपर्यंत ते सुरू होते. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (एसआयसी) उमेदवार महमूद खान अचकझाई (वय ७५) हेही अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते.

नॅशनल असेंब्लीच्या संयुक्त सत्रात झरदारी यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले. पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे झरदारी पती आहे तर ‘पीपीपी’चे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांचे वडील आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ, ‘बिलावल भुट्टो झरदारी, ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) ओमर अयुब आणि ‘पीएमएल-एन’चे इशाक दार आदी बड्या नेत्यांनी मतदान केले. मतमोजणीपूर्वीच बिलावल भुट्टो यांनी वडिलांच्या विजयाबद्दल खात्री व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR