37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगपरकीय चलनसाठ्यात मोठी वाढ

परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ

नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक दिलासादासयक बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे अधिक कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात परकीय चलन साठ्यात ९.५३ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७९ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ६.५५ अब्ज डॉलरने वाढून ६२५.६२६ अब्ज डॉलर झाला आहे.

सलग दोन आठवडे भारतातील परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे. याआधी गेल्या आठवड्यात, एकूण परकीय चलन साठा २.९७५ अब्ज डॉलरने वाढून ६१९.०७२ अब्ज डॉलर झाला होता. परकीय चलनसाठा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाने उच्च पातळी गाठली होती. जी ६४५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची सर्वकालीन उच्च पातळी होती. तेव्हापासून आजतागायत परकीय चलन राखीव पातळी या पातळीवर पोहोचलेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारताचा परकीय चलनसाठा ६५० अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात सोन्याचा साठा ५६९ दशलक्ष डॉलरने वाढून ४८.४१७ अब्ज डॉलर झाला आहे. यासह, मध्यवर्ती बँकेने असेही म्हटले आहे की स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) मध्ये कपात करण्यात आली आहे. जी १७ दशलक्ष डॉलरवरुन १८.१८ बिलियन डॉलर झाली आहे.

साठा डॉलरच्या स्वरुपात साठवला जातो
देशाच्या परकीय चलन साठ्याला फोरेक्स किंवा फॉरेन रेव्हेन्यू एक्सचेंज असेही म्हटले जात आहे. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि विश्वासू चलन आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR