36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरऔराद शहाजनीचे तापमान उच्चांकी ४४. ५ अंश सेल्सिअसवर

औराद शहाजनीचे तापमान उच्चांकी ४४. ५ अंश सेल्सिअसवर

निलंगा : सूर्य आग ओखत तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. तालुक्यातील औराद शहाजानी येथील तापमानामध्ये उच्चांकी वाढ होऊन आज दि. ५ मे रोजी तापमान ४४.५ अंश झाल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे औरादचा तेरणा व मांजरा काट उच्चांकी तापमानात होरफळून जात आहे. वर्षभरातील आज पहिल्यांदाच औराद शहाजानी येथील तापमानात उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस नोंद झाली असल्याचे हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदी आजच्या लोकांना थंडीच्या दिवसात थंडीचा त्रास तर उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच मे महिना ओझाडल्यानंतर पहिल्या दिवसापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली दिवसेंदिवस तापमान वाढून आज दिनांक पाच मे रोजी औराद शहाजानी येथील उच्चंकी तापमान ४४.५ अंश सेल्सिअस झाले आहे. सलग दोन दिवस औराद शहाजानी येथील तापमान ४४ अंश सेल्सिअस होते तर तिस-या दिवशी उच्चांकी तापमान गाठून तापमानाचा पारा ४४.५ अंश सेल्सिअस झाला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असून दुपारच्या वेळी सूर्या ओखत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहेत.

सलग पाच दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. यात दि. १ मे रोजी ४२.५ अंश सेल्सिअस तर दि. २ मे रोजी ४३ अंश सेल्सिअस व आज दि. ३ मे रोजी ४४ अंश सेल्सिअस दि. ४ मे ४४ अंश सेल्सिअस तर दि. ५ मे रोजी ४४.५ अंश सेल्सियस तापमान झाल्याने औरादसह परिसर तापला आहे. या वाढत्या उच्चांकी तापमानामुळे आबाल वृद्ध लहान मुले व नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळी गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. सलग पाच दिवसापासून तापमानात वाढ होऊन आज दि. ५ मे रोजी औराद शहाजानी येथील हवामान केंद्रात पहिल्यांदाच उच्चांकी ४४. ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR