33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयथायलंडमध्ये देखील अयोध्या नगरी!

थायलंडमध्ये देखील अयोध्या नगरी!

बॅँकॉक : भारतासह जगभरात अयोध्येतील राम मंदिर चर्चेचा विषय बनले असताना भारतातच नाहीतर देशाबाहेरही एके ठिकाणी अयोध्या नगरी आहे, असा दावा केला जात आहे.

भारताबाहेर थायलंडमध्ये ६७४ वर्षे जुने ठिकाण आहे, जिथे अनेक मंदिरे आणि त्यांचे अवशेष आहेत. या ठिकाणाचे नाव भारतातील अयोध्यासारखे आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

या प्राचीन शहराची स्थापना १३५० मध्ये रामाठीबोडी प्रथम याने केली होती. या शहराने चार शतकांहून अधिक काळ सियामी साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जात होते. या शहराचे नाव आयुथया आहे.हे प्राचीन शहर चाओ फ्राया नदीच्या काठी वसलेले आहे. एकेकाळी हे शहर सागरी व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र होते.

थेरवडा बौद्ध धर्म आणि हिंदू-ब्राह्मण परंपरा यांचे सुंदर मिश्रण या शहरात पाहायला मिळते. या ठिकाणालाच अयुथ्या असे नाव देण्यात आले आहे. अयोध्या रामायण आणि हिंदू धर्माशी संबंधित आहे.

अशा परिस्थितीत या प्राचीन शहरातही रामायणाचा प्रभाव आहे. अयुथ्या पहिला शासक, राजा रामाथीबोडी याने या शहराचे नाव अयुथ्या ठेवले, जे या प्रदेशाच्या संस्कृतीवर रामायणाचा प्रभाव प्रतिंिबबित करते.

रामायण आणि इथल्या राजांचा संबंध इतका प्राचिन आहे, की इथल्या राजांच्या नावावरही राम ही पदवी आहे. भारताप्रमाणे थायलंडचीही श्रीरामावर अपार श्रद्धा आहे. येथेही भगवान श्रीरामाची पूजा केली जाते.

अयुथ्याच्या राजाने या शहरात काही हिंदू मंदिरेही बांधली आहेत. अयुथ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शंकराची मंदिरे आहेत. प्रभू रामाशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी येथील राजांनी आपल्या नावात राम हे नाव जोडले. हे लोक स्वत:ला प्रभू रामाचे वंशज मानतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR