33.1 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरनिवासी महिला डॉक्टरला रॉडने मारहाण

निवासी महिला डॉक्टरला रॉडने मारहाण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी महिला डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या वादात घाटी रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टर जखमी झाली आहे. जखमींवर उपचार करत असताना अचानक ८-१० जणांची टोळी रुग्णालयात घुसली. त्यांनी महिला डॉक्टरच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामुळे महिला डॉक्टरच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णासह त्याच्यासोबत आलेल्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

दरम्यान, हा तुफान राडा सुरू असताना सुरक्षेसाठी तैनात असलेले एम.एस.एफ जवानांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी न केल्यामुळे चार जवानांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन गटांमध्ये घाटी रुग्णालयाबाहेर हाणामारी झाली होती. एका गटातील जखमी शेख सय्यद शेख समशेर आणि शेख शेखिल शेख समशेर हे उपचारासाठी घाटीतील अपघात विभागात दाखल झाले होते, जखमींवर उपचार सुरू असतानाच पुन्हा ८-१० जणांच्या टोळक्याने घाटीत येऊन मारहाण सुरू केली.

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्राय दिली आहे. त्या म्हणाल्या की, ही अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहिल? मूळात या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे हे प्रकार घडत असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR