बीड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी शासन स्तरावर मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रशासनाने यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन स्तरावर कुणबी नोंदींची तपासणी केली जात आहे. मराठवाड्यापासून याची सुरुवात झाली असून आता राज्यभरात प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. दरम्यान, मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदीत बीड अव्वल ठरला आहे.
मराठवाड्यात एकूण ८ कोटी ९९ लाख ३३ हजार २८१ दस्तऐवज तपासल्यावर २९ लाख १ हजार १२१ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक नोंदी बीड जिल्ह्यात सापडल्या आहेत. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत २२ लाख दस्तावेज तपासण्यात आले असून ज्यात एकूण ११ हजार १२७ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार १२७ मराठा कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात आढळल्या आहेत. तर, दुसरीकडे प्रशासनाच्या माध्यमातून या कुणबी प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तसेच परळीमध्ये मात्र आतापर्यंत एकही कुणबी नोंद आढळून आलेली नाही. बीड जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तपासण्यासाठी आतापर्यंत २२ लाख दस्ताऐवज तपासण्यात आले आहेत. ज्यात, उर्दू व मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी भाषांतर करांचीही मदत घेतली जात आहे.