21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयबेळगाव सीमाप्रश्­न संपुष्टात?

बेळगाव सीमाप्रश्­न संपुष्टात?

बेळगाव : बेळगावात सुवर्ण विधानसौध निर्माण करण्यात आल्यामुळे सीमाप्रश्­न संपुष्टात आल्याचा जावईशोध राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी लावला आहे. डिसेंबर महिन्यात सुवर्ण विधानसौध होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी यांनी मंगळवारी सुवर्ण विधानसौधला भेट दिली.

तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना होरट्टी यांनी सुवर्ण विधानसौध आणि हिवाळी अधिवेशनामुळे समिती आणि सीमालढ्याचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे वक्तव्य केले आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. धजदचे नेते आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बेळगावात सुवर्ण विधानसौध उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले. बेळगाव येथे सुवर्ण विकाससौध बांधल्याचा हेतू यशस्वी झाला आहे. तसेच बेळगाव सीमाभाग हा कर्नाटकाचाच असल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगत होरट्टी यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही होरट्टी यांनी मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या विरोधात अनेकदा विधाने केली आहेत. मात्र, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत म. ए. समितीचा लढा कायम सुरू राहणार आहे, असे मत होरट्टी यांच्या विधानानंतर समिती कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

मराठी शाळांविरोधातही वक्तव्य
यापूर्वी शिक्षणमंत्री असतानादेखील होरट्टी यांनी मराठी शाळांविरोधात वक्तव्य केले होते. तसेच अगोदर कन्नड शहारांचा विकास करा, नंतर इतर माध्यमांचा विचार करा, असे मत व्यक्त केल्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता. कर्नाटकातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून म. ए. समिती विरोधात गरळ ओकतात, मात्र मराठी भाषिकांनी आपला लढा कायम ठेवला आहे, हे कर्नाटकाने ध्यानात घेतले पाहिजे. कोणी काही बोलले म्हणून सीमालढा संपत नाही. मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कांसाठी लढा सुरूच ठेवतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR