38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयचीनमध्ये मोठा आर्थिक घोटाळा

चीनमध्ये मोठा आर्थिक घोटाळा

अर्थव्यवस्थेला बसणार फटका कंपनीच्या हेराफेरीमुळे गुंतवणूकदार संकटात

बीजिंग : चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एव्हरग्रेंडमध्ये ७८ अब्ज डॉलरचा महाघोटाळा उघडकीस आला असून हा चीनमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे. या घोटाळ्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, एव्हरग्रेंडचे संस्थापक आणि चेअरमन शू जियायीन यांनी कागदोपत्री हेराफेरी करून कंपनीचा महसूल तब्बल ७८ अब्ज डॉलरने वाढवून दाखविला. खोट्या उत्पन्नाच्या आधारावर कंपनीने आपले रोखे चढ्या भावाने विकले. आता हे रोखे खरेदीदार अडचणीत आले आहेत.

३०० अब्ज डॉलर्सचे कर्ज
एव्हरग्रेंड ही जगातील सर्वाधिक कर्जात बुडालेली कंपनी आहे. तिच्यावर तब्बल ३०० अब्ज डॉलरपेक्षाही जास्त कर्ज आहे. २०२१ मध्ये कंपनीने कर्जाचे हप्ते थकवले होते. चीनमधील संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रात संकट निर्माण झाले होते. चिनी अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटचा वाटा तब्बल ३० टक्के आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR