28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकोट्यवधींचे हेरॉईन जप्त; म्यानमारच्या पाच नागरिकांना अटक

कोट्यवधींचे हेरॉईन जप्त; म्यानमारच्या पाच नागरिकांना अटक

ऐझॉल : मिझोराममध्ये आसाम रायफल्सला मोठे यश मिळाले आहे. १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉईन आणि १.२१ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय चंफई जिल्ह्यात म्यानमारच्या पाच नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकांनी मिझोराम-म्यानमार सीमेवरील जोते आणि जोखावथार गावात कारवाई सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मादक पदार्थ जप्त करण्यात आले.

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या हेरॉईनची बाजारातील किंमत १८.३० कोटी रुपये आहे. या काळात भारतीय चलनी नोटांमध्येही बेहिशेबी रोकड सापडली. जप्त करण्यात आलेली रोकड ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि जप्त केलेले ड्रग्ज कायदेशीर कारवाईसाठी चंफई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

मंगळवारी मतदान झाले
४० सदस्यीय मिझोराम विधानसभेसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर तीन दिवसांनी ही मोहीम सुरू करण्यात आली. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR