27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीयड्रग्जपासून मुक्ती द्या!

ड्रग्जपासून मुक्ती द्या!

गंगानगर : रमेश कुमारने बिकानेरमध्ये काम करत असताना हेरॉइनचे इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली आणि तब्बल पाच वर्षे तो या नशेच्या पूर्णपणे आहारी गेला होता. कुमार आता हेरॉइनच्या व्यसनाच्या अथांग खोलीतून कसाबसा बाहेर आला असून, जीवनाची घडी बसवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सीमेपलीकडून जिल्ह्यात आणल्या जाणा-या अमली पदार्थांना बळी पडून गंगानगरमध्ये कुमार यांच्यासारखे अनेकजण आहेत, जे बरे होण्याच्या आशेने व्यसनमुक्ती केंद्रात गर्दी करतात. राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या गंगानगर जिल्ह्यातील स्थानिक लोक अमली पदार्थांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी लावून धरत आहेत.

पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असलेल्या कुमार यांनी सरकारला जिल्ह्यातील अमली पदार्थांचे सेवन संपवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. एका महिन्यात २५० ते ३०० रुग्ण पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु त्यापैकी मर्यादित खाटांमुळे केवळ १५ रुग्णांना एका वेळी दाखल केले जाऊ शकते. त्यापैकी बहुतांश गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यातील आहेत. आम्ही सरकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती डॉ. मनीषा बागला यांनी दिली.

सवाई माधोपूरमध्ये त्रिकोणी लढत
रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या राजस्थानच्या सवाई माधोपूर मतदारसंघात पर्यावरणकिंवा त्यासंदर्भातील समस्या नव्हे तर जातीय समीकरणे निर्णायक घटक आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा व काँग्रेसचे विद्यमान आमदार दानिश अबरार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या बंडखोर आशा मीणा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR