परभणी : तालुक्यातील तरोडा येथे लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याच बरोबर भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तरोडा गावचे सरपंच मुरलीधर शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश सरचिटणीस बन्सीलाल भंडारी, उपसरपंच लक्ष्मण दुगाणे, भाजपा परभणी तालुकाध्यक्ष देवा शिंदे, युवा नेते शिवाजी शेळके, भाजपा परभणी तालुका उपाध्यक्ष अंबादास शेळके, तरोडा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ खवले, विष्णु खवले, जब्बार पटेल, ग्रा. पं. सदस्य तरोडा बळीराम कदम, कोंडीबा गायकवाड, व्यंकटी दुगाणे व तरोड्याचे कवी सय्यद चॉंदभाई उपस्थित होते.
यावेळी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक विक्रम उकंडे, चिंतामन जाधव, शिवाजी घुगे, रंगनाथ गायकवाड, सुहास भदरगे, भारत राऊत, काशिनाथ खके, रामराव मगर आदिंना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व आयोजन काशिनाथ गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गायकवाड, भारत शेळके, महेश गायकवाड, छगन गायकवाड, विशाल गायकवाड, कृष्णा गायकवाड, नवनाथ गायकवाड, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, आकाश गायकवाड, कैलास गायकवाड, कल्याण बाणमारे, विकास बाणमारे, सचिन बाणमारे आदित्य गायकवाड आदींनी प्रयत्न केले.