24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयभाजप उमेदवार पोहचले देवाच्या दारी

भाजप उमेदवार पोहचले देवाच्या दारी

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. काल सहाव्या टप्प्याचे मतदान झाले. आठ राज्यांमध्ये एकूण ५८ मतदारसंघात मतदान झाले. सहाव्या टप्प्यात एकूण ११.१३ कोटीहून अधिक मतदार ८८९ उमेदवारांचे राजकीय भवित्वय ठरवणारे आहेत. अशातच भाजपचे लोकसभा उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी देवाच्या दारी पोहोचत असून, विजययाची याचना केली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि संबलपूरचे भाजपचे लोकसभा उमेदवार धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर येथील माँ समलेश्वरी मंदिरात पूजा केली. त्याचवेळी पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी पुरीच्या मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांच्याशिवाय इतर अनेक नेतेही मंदिरात पोहोचले.

संबित पात्रा यांनी पुरी येथील मंदिरात जाऊन पूजा केली. प्याशिवाय कुरुक्षेत्र, हरियाणातील भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल यांनीही सिद्धेश्वर मंदिरात प्रार्थना केली, दरम्यान विरोधकांना भाजप नेत्यांच्या मंदिरात विजयाची कामना करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR