21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभाजप खासदार रमेश बिधुरी यांनी मागितली माफी

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. भाजप खासदाराने गुरुवारी संसदीय समितीला सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दानिश अली यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. याचीही त्यांना खंत आहे. बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने समिती हे प्रकरण संपवून आपला अहवाल सभापतींना पाठवू शकते, असे वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

दानिश अली यांनीही समितीसमोर हजर होऊन घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप फेटाळून लावला. लोकसभेत बोलताना रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. लोकसभा अध्यक्षांनी नंतर रमेश बिधुरी यांचे शब्द कामकाजातून काढून टाकले. रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला आणि बिधुरी यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार दानिश अली आणि भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यातील वादावर लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक झाली. संसदेच्या विशेष अधिवेशनात चांद्रयान-३ चे यश आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या यशावर झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी २१ सप्टेंबर रोजी दानिश अली यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR