22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे मिशन अयोध्या, उद्या पहिली विशेष रेल्वे रवाना होणार

भाजपचे मिशन अयोध्या, उद्या पहिली विशेष रेल्वे रवाना होणार

मुंबई : भाजपकडून मुंबईकरांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन अयोध्या सुरु करण्यात आले आहे. त्याचसाठी उद्या (दि.५) रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली विशेष रेल्वे रवाना होणार आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनानंतरही अनेक महिने तसेच सकारात्मक राजकीय वातावरण कायम ठेवण्याचे भाजपचे नियोजन आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचा हा मेगाप्लॅन तयार करण्यात आला आहे.

मिशन अयोध्या असे अमलात येईल…
आमदाराने त्यांच्या मतदारसंघातून ५ हजार तर खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातून २० हजार राम भक्तांना अयोध्येत न्यायचे आहे. आमदार आणि खासदार यांच्या मदतीने जाणारे राम भक्त वेगवेगळे असणार आहेत. म्हणजेच एका लोकसभा मतदारसंघातून ४० ते ५० हजार लोकं राम लल्लाचे दर्शन घेतील असे नियोजन करण्यात आले. त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या. एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पुढील अनेक महिन्यात पार पाडली जाईल. त्यासाठी खास रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

राम भक्तांच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न
राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पुढील काही महिने प्रत्येक मतदारसंघातून राम भक्तांची अयोध्या वारी सुरु राहील, असे सांगण्यात आले होते. अयोध्येत राम भक्तांसाठी निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यासाठी पक्षाच्या विशिष्ट पदाधिका-यांना जबाबदारी देण्यात येईल आणि काही महिने त्यांचा तेथेच मुक्काम असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR