दमोह : मध्य प्रदेशमधील दमोह येथील अवैध फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
दमोह येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात बेकायदा फटका कारखाना सुरू होता. येथे दिवाळीसाठी फटाके मोठ्या प्रमाणात बनवले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोटात जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबात जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, शहराच्या मध्यभागी असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. उपचार सुरू आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत, दोषींवर कारवाई केली जाईल.