माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील पूल तुटला

श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेटकडे जाणारा रस्त्यावर एकमेव असलेल्या पूलाचे बांधकाम व्यवस्थित झालेले नसल्याने या नाल्याला अनेक नाले जोडलेले असल्याने या नाल्यात सततच्या पावसाने पूर आला त्यामुळे पुल तुटून रस्ता बंद झाला असून उमरा- मेट कडे जाणारा रस्ता बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. सिंदखेड गावाला तिन्ही बाजूने घेरुन असलेल्या नाल्यालाही पूर आल्याने गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्ग महामार्ग क्रमांक १६१ अ वर माहूरपासून दहा किमी अंतरावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणा-्या रस्त्यावर एकच पूल असून या नाल्याला मोठे पूर येतात बांधकाम व्यवस्थित झाले नसल्याने तसेच या नाल्याला अनेक छोटे मोठे नाले जोडलेले असल्याने अचानकपणे या नाल्यालां पूर येतो सततच्या पावसामुळे अचानकपणे पूर आला पुलाच्या खालील जागेत कचरा व झाडेअडकल्याने पाणी पुलावरून गेले त्यामुळे एकीकडचा फुल तुटला त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक दि. ३० जुलै रोजी दुपारपासून बंद झालेली आहे.

मौजे सिंदखेड गावाला तिन्ही बाजू ने मोठ्या नाल्याने घेरलेले असून या नाल्यात मनीराम थड प्रकल्पाचे पाणी नाल्यातून जात असल्याने गावाला पुरामुळे धोका होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. मौजे मेटकडे जाणा-या रस्त्यावरील पूल तुटल्याने मेट कडे जाणारा एकमेव रस्ता बंद झाल्याने संबंधित विभागांनी तात्काळ नाल्याची पाहणी करून रस्त्याची व्यवस्था करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

किनवटमध्ये तरूण वाहून गेला
किनवट तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून यात आंदबोरी, पांगरपहाड, अप्पारावपेठ, रेवानाईक तांड्याचा संपर्क तुटला असून या दरम्यान, कंचली येथील ३२ वर्षीय राजू रेड्डी दांडेलु हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुदैर्वी घटना २९ जुलै बुधवार रोजी चार वाजेच्या दरम्यान सायंकाळी घडली. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत असलेले राजू दांडेलु हे कंचली येथून रेवा नाईक तांड्याकडे जात असताना कंचली गावालगत असलेल्या कंचली आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहणा-या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. परंतु गुरूवारी सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेहाचा शोध लागला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news