रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमधे रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे. आता या सर्वांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चाकणकर यांनी तक्रारीत काय म्हटले?
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते की, अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची ९ वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मी तिथे जात होती. १८ मार्च २०२६ रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समजले. त्यानंतर खरात यांच्यासोबत सामाजिक कार्यक्रमातील फोटो वापरून माझ्यावर आरोप करण्यात आले. २० मार्च २०२६ रोजी सोशल मीडिया तपासताना १९ फेसबुक/इंस्टा/ युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचे आढळले. या सर्वांची नावे आणि पोस्टचे स्क्रीनशॉट चाकणकर यांच्याकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आगामी काळात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news