सोलापूर : शरीराबरोबरच मन, भावना, विचारांचे संस्काराचे धड़े शारीरिक शिक्षणातून मिळतात. स्नायू हालचालीमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास त्यातूनच साधला जातो. शारीरिक हालचालीद्वारे शरीर, मन व आत्म्याचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.
मात्र, काही वर्षांपासून शाळा व पालकांकडून गुणांच्या टक्केवारीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या दिसू लागल्या आहेत, याबाबत पालक आणि मुलांनी सजग होऊन कृतिशील प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणाअंतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीच्या व्यायामावर भर दिला आहे. या विद्याथ्यांच्या शरीरावर व अवयवांवर योग्य तो तावा मिळवून कौशल्य संपादन करण्यासाठी धावणे, फेकणे, उड्या मारणे याचा समावेश आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, इंद्वात्मक व्यायाम प्रकारांचा समावेश आहे. तर इयत्ता नववी व दहावीतील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते.
तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, अवधानाचे केंद्र बनणे, समाजमान्यता प्राप्त करणे, अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त नायकत्व करणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे शारीरिक शिक्षण हा विषय पुस्तकांन कृतीतून त्याची आवड निर्माण करून देणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ राहील, यादृष्टीने तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावरील कीडा स्पर्धा राबविणे अपेक्षित आहे. त्यात सर्वच शाळांना सहभाग असावा, असे नियोजन असते. नुकत्याच शाळांमध्ये स्पर्धा पार पडल्या आहेत.असे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्रसाद मिरकले म्हणाले.