Homeसोलापूरसोलापुरात एसटी बसचा ब्रेक फेल

सोलापुरात एसटी बसचा ब्रेक फेल

चालकाच्या तत्परतेमुळे २५ प्रवाशांचे प्राण वाचले

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. सोलापुरमध्ये २५ प्रवाशांना घेऊन जाणा-या एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटीने डिव्हायडरवर तोडून कारला धडक दिली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीतून सोलापूरकडे एक एसटी बस येत होती. या बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर जवळील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ बस येताच बसचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे एसटी बस डिव्हायडरवर चढून कारला धडकली.

या घटनेत चालकाने सतर्कता दाखवल्याने गाडीतील २५ प्रवासी सुखरूप होते. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. झालेल्या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला.

सदर घटना कशामुळे घडली ? हा अपघात कसा झाला? या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून एसटी महामंडळाच्या गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR