22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीगीता जयंती निमित्त गितेच्या १२ व्या अध्यायाचे सामुहीक पठण

गीता जयंती निमित्त गितेच्या १२ व्या अध्यायाचे सामुहीक पठण

जिंतूर : श्री संचारेश्वर विद्यालय येथे दि. २२ डिसेंबर रोजी गीता जयंती निमित्त गीतेच्या १२व्या अध्यायाचे सामूहिक पठण घेण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महालिंगप्पा कुरे, मनिषा पोरवाल, राजाभाऊ नगरकर, मनोज सारडा, मनोज रजोतिया, रवीकुमार पेशकार, प्रसाद खेर्डेकर मुख्याध्यापक सुरेश अन्नदाते, डॉ.शैलेश मंत्री, शितल पोरवाल, पुनम सारडा, हेमलता वट्टमवार, राधा काबरा, सोनल सोनी, सुनिता मंत्री यांची उपस्थिती होती.

सर्व प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भगवद् गीता व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सुरेश अन्नदाते यांनी केले. इयत्ता ५वी ते ७वीतील विद्यार्थ्यांनी सामूहिक १२व्या अध्यायाचे सुंदर पद्धतीने पठण केले. सकाळ सत्रात इयत्ता १ली ते ४थी तील विद्यार्थ्यांचे १२व्या अध्यायाचे पठण झाले. मनोज सारडा यांनी व मनिषा पोरवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गीतेच्या अध्ययाचे पठण करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्यावा तसेच गीतेचे महत्व सांगून मुलांकडून मान्यवरांनी घोषवाक्य वदवून घेतले.

संजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे ऋणनिर्देश केले. सूत्रसंचालन किरण नाईक यांनी तर सांगता विजयमाला फड यांनी शांती मंत्राने केली. शिवाजी सोमोसे, किरण नाईक, संजय गायकवाड, बाळासाहेब ठोंबरे, वैभव जोशी, दत्ता राठोड, विकास गिरे, उषा खराबे, विजयमाला फड, रूपाली सोनसळे, दिपाली देशपांडे, मनिषा धाबेवार, संगीता सेवलकर, मोनिका घोडके, वर्षा कोडगावकर, सुनिता टाक, पूजा बुधवंत यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR