37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार

सुषमा अंधारे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. राजकीय फायदा उचलण्यासाठी आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी लहान मुलाचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अंधारे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर आरोप करताना त्यांच्या सून पूजा तडस यांच्याबरोबरच त्यांच्या १७ महिन्यांच्या मुलाला व्यासपीठावर आणले होते. या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

यासंबंधी वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आधी देखील पूजा तडस यांनी रामदास तडस कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे. पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी दाखल केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेचे आयोजन ठाकरे गटाच्या नेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले होते. सुषमा अंधारे यांनी या माध्यमातून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असून निवडणूक प्रचारात त्यांनी लहान मुलाचा वापर केला आहे, या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR