37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवधाराशिवची लढत प्रतिष्ठा विरुध्द अस्तित्वाची

धाराशिवची लढत प्रतिष्ठा विरुध्द अस्तित्वाची

सुभाष कदम
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत गेल्या काही वर्षांत २००९ मधील अपवाद वगळता जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे. सध्याचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे आहेत. २०१९ मध्ये ओमराजेंनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. २०१९ मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खासदारकी टिकविण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनीही कंबर कसली असून ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे.

देशात व राज्यात शिवसेना-भाजपाची युती होती. युतीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना लढवत होती. या जागेवर शिवसेनेचा उमेदवार अनेक पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेला आहे. २००९ मध्ये फक्त सहा हजार मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले. त्यांनी २००९ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर मोदी लाटेत विजयी झाले आहेत

. त्यांनी आ. राणाजगजितसिं ह पाटील यांचा दारुण पराभव केला. २०२४ मध्येही ओमराजे यांनाच महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. महायुतीमध्ये भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्नी अर्चनाताईंना राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आहे. २०१९ मध्ये ओमराजे यांच्याकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आ. पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खा. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. राज्यासह देशातील फोडाफोडीचे राजकारण एका वेगळ्या वळणावर गेल्याने मतदारांचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही. त्यामुळे येणारे निकाल कसे असतील, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR