27.2 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeपरभणीगरजू रूग्णांसाठी डोळ्यांच्या टेरीजियम मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन

गरजू रूग्णांसाठी डोळ्यांच्या टेरीजियम मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन

परभणी : जिल्ह्यात प्रथमच डोळ्यातील मास वाढणे (टेरीजियम) यावर दि. १० मे रोजी आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत. गरजू रूग्णांनी त्वरीत नाव नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

टेरीजियम या डोळ्याच्या आजाराबद्दल माहिती देताना आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालयचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, टेरीजियम हा आजार म्हणजे डोळ्यावर मास वाढणे किंवा पांढ-या व लालसर मास डोळ्यात दिसने यालाच वैद्यकीय परिभाषेमध्ये टेरीजियम असे म्हटले जाते. याची प्रामुख्याने पुढील कारणे आपल्यास दिसून येतात. यामध्ये परदेशी शरीर संवेदना, डोळ्यातून अश्रू, डोळे कोरडे होणे, लालसरपणा, धूसर दृष्टी, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे दिसू शकतात. यामध्ये काही कारणांमुळे काळ्या बुब्बुळावरच्या पारदर्शक पापुद्रयावर काही धुलीकण अथवा कचरा अडकून बसलेला असेल आणि बरेच दिवस तो दुर्लक्षित राहिला तर त्या भोवती नैसर्गिक रित्या रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होते आणि या स्वरूपाचा पापुद्रा वाढण्यास सुरुवात होते.

अशा अनेक रुग्ण आहेत त्यांना टेरीजियम आजार आहे. खाजगी रुग्णालयात हा खर्च न परवडणारा असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिंदे यांनी सांगितले. गरजू रूग्णांवर टेरीजियम ही शस्त्रक्रीया आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालय येथे दि.१० मे रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे मोफत होणार आहे. गरजू रूग्णांनी लवकरात लवकर आर.पी. हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालय मध्ये येऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR