37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसची पीएम मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेसची पीएम मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लीम लीगशी केली होती. त्यावरुन आता काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान मोदींनी ६ एप्रिल रोजी राजस्थानच्या अजमेर येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली होती. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप आहे. आज काँग्रेसकडे ना तत्त्वे आहेत, ना धोरणे आहेत. जणू काही काँग्रेसने सर्व काही कंत्राटावर देऊन संपूर्ण पक्षाला आउटसोर्स केले आहे अशी टीका पीएम मोदींनी केली होती.

काँग्रेसचा पलटवार
काँग्रेसने पंतप्रधानांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, लोकसभा निवडणुकीत भाजप १८० जागांचा आकडा पार करणार नाही. या भीतीनेच ते पुन्हा हिंदू-मुस्लिम करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले की, त्यांच्या वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR