37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगचांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात पुन्हा किरकोळ वाढ

चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात पुन्हा किरकोळ वाढ

जळगाव : चांदीच्या भावात सलग दुस-या दिवशी मोठी वाढ होऊन सोमवार, ८ एप्रिल रोजी ती एक हजार ५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदी ८३ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकीवर पोहोचली. सोन्याच्या भावात ५० रुपयांची वाढ होऊन ते ७१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. मंगळवार, ९ एप्रिल रोजी असलेल्या गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूचे भाव काय राहतात? या कडे आता ग्राहकांचे लक्ष आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली मागणी, भारतात लग्नसराईची खरेदी अशा वेगवेगळ्या कारणांनी सोने-चांदीचे भाव दररोज वाढतच जात आहे. त्यात सोमवार, ८ एप्रिल रोजी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी ८१ हजार ५०० रुपयांवरुन थेट ८३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. चांदीचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव आहे. सोन्याच्या भावात केवळ ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

आता चांदीची घौडदौड
मार्च महिन्यापासून भाववाढ होत असलेल्या दोन्ही मौल्यवान धातूंपैकी सुरुवातीला सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्यात चांदीत फारसी वाढ होत नव्हती. आता मात्र तीन दिवसांपासून सोन्यात कमी आणि चांदीमध्ये जास्त वाढ होत आहे.

आठ दिवसात चांदीत सात हजारांची वाढ
दिनांक सोने चांदी
१ एप्रिल- ६९,४००-७६०००
४ एप्रिल – ७०,०००-७९,२००
५ एप्रिल – ७०,२५०-७९,५००
६ एप्रिल – ७१,१००-८०,९००
७ एप्रिल – ७१,२५०-८१,५००
८ एप्रिल – ७१,३००-८३,०००

गुढीपाडवा खरेदीचा मुहूर्त
मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूचे काय भाव राहतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR