17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयपाच राज्यांत कॉंग्रेसची मुसंडी, भाजपला धक्का?

पाच राज्यांत कॉंग्रेसची मुसंडी, भाजपला धक्का?

नवी दिल्ली : मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणा-या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निवडणूकपूर्व ओपिनियन पोल समोर आला असून, एबीपी-न्यूज-सी वोटरच्या सर्व्हेमधून कॉंग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली आहे, तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले आहे. पाचपैकी २ राज्यांत कॉंग्रेस, तर एका राज्यात भाजपला आघाडी मिळू शकते, तर अन्य दोन राज्यांत प्रादेशिक पक्ष प्रबळ ठरतील, असा दावा करण्यात आला आहे.

तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीकडे लोकसभेची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. सध्या या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच निवडणूकपूर्व ओपिनियन पोल समोर आला आहे. अखेरच्या टप्प्यातील ओपिनियम पोलमधील कलानुसार तेलंगणात चंद्रशेखर राव यांचा बीआरएस, मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेस आणि राजस्थानमध्ये भाजप बाजी मारू शकतो, अशी शक्यता ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

या सर्व्हेनुसार तेलंगणामधील ११९ जागांपैकी ४९ ते ६१ जागी बीआरएस, तर कॉंग्रेस ४३ ते ५५ आणि भाजपला ५ ते ११ जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यात ६ ते ८ जागा जातील, असाही अंदाज वर्तवला आहे. विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोरममध्ये एमएनएफला १७ ते २१, झेडपीएमला १० ते १४, कॉंग्रेसला १० आणि इतरांना ० ते २ जागा मिळू शकतात.

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच
कॉंग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसलाच पसंती मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्व्हेनुसार छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला ४५ ते ५१, भाजपला ३६ ते ४२ आणि इतरांना २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR