24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच दिल्लीत आज काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. काँग्रेस पक्षाने दिल्लीतील AICC मुख्यालयात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

‘GYAN’ या संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा आहे. ‘G- गरीब, Y -युवा, A-अन्नदाता, N- नारी ही काँग्रेसची संकल्पना आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला आहे. त्यात युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि समता न्याय यांचा उल्लेख आहे. आम्ही एकत्रितपणे या अन्याय काळातील अंधार दूर करू आणि भारतातील लोकांसाठी समृद्ध, न्यायाने परिपूर्ण आणि सुसंवादी भविष्याचा मार्ग प्रशस्त करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.
यामध्ये २५ गॅरंटी दिल्या आहेत. शेतकरी, मजूर, युवा, रोजगार, महिला यांच्याबाबत काही आश्वासने देण्यात आली आहेत.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज पक्ष कार्यालयातून तो प्रसिध्द केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षानेही देशभर जात आधारित जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे.
या जाहीरनाम्याबाबत माहिती देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, २०२४ मध्ये केंद्रात आमचे सरकार आल्यास सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत करेल. त्याशिवाय शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासनही त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR