17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या

पुण्यात कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या

खडकवासला धरणाच्या पाण्यात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली उघडकीस आली आहे.

गुरुवारी पहाटे ६ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करण्यात आले होते. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तूकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, अशा घटनांमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR