27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडायुगांडात क्रिकेट क्रांती

युगांडात क्रिकेट क्रांती

नवी दिल्ली : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. युगांडा पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी २० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी-२० विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने २०२४ टी-२० विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासह सर्व २० संघ सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मेगा इव्हेंटसाठी निश्चित झाले आहेत.

नामिबिया हा आफ्रिका विभागातील दुसरा संघ पात्र ठरला आहे. दरम्यान, झिम्बाब्वेला सलग दुस-यांदा विश्वचषकात स्थान मिळू शकले नाही. झिम्बाब्वेसाठी हा आणखी एक धक्का आहे. झिम्बाब्वेला टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी रवांडाच्या युगांडावर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करावी लागणार होती, पण युगांडाने स्पर्धेतील त्यांच्या अंतिम सामन्यात रवांडाचा अवघ्या ६५ धावांत पराभव केला आणि लक्ष्याचा पाठलाग केवळ ८.१ षटकांत नऊ विकेट्स राखून केला आणि सहा सामन्यांतील आपला पाचवा विजय नोंदवला.

सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे अजूनही केनियाविरुद्ध खेळत आहे आणि त्यांनी २० षटकांत २१७ धावा केल्या आहेत. आता जरी त्यांनी हा सामना जिंकला तरी ते पात्र ठरणार नाहीत आणि युगांडा आणि नामिबियाकडून झालेल्या पराभवामुळे त्यांना धक्का बसला आहे.
वेस्ट इंडिज आणि यूएसए यजमान म्हणून पात्र ठरल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेची लाइनअप आता निश्चित झाली आहे, तर २०२२ टी-२० विश्वचषकातील टॉप ८ संघांनीही स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी टी-२० क्रमवारीच्या आधारे पात्रता मिळवली तर उर्वरित आठ संघ युरोप क्वालिफायर (२ संघ), पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर (१ संघ), अमेरिका क्वालिफायर (१ संघ), आशिया पात्रता (२ संघ) आणि आफ्रिका त्रता (२ संघ) झाले आहेत.

टी २० विश्वचषक २०२४ साठी पात्र होणारे संघ
वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान , नामिबिया, युगांडा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR