24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र१४ वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी

१४ वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी

मुंबई : इयत्ता नववीत शिकणा-या एका १४ वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करंजाडे येथे राहणारी १४ वर्षीय तरुणी कामोठे येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेते. एक नोव्हेंबर रोजी तिची आई घरी आली असता मुलीने दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांनी दुस-या चावीने दरवाजा उघडला.

यावेळी लोखंडी ग्रीलच्या छताच्या पत्र्याच्या खाली लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर महिन्यात शाळेतील वर्गात एका विद्यार्थ्याने पाठीमागून पाठीला हात लावत असलेला फोटो ‘काइन मास्टर’ या व्हीडीओ मेकर अ‍ॅपवर एक व्हीडीओ एडिट केला होता. तसेच खाली अश्लील शब्द लिहून वेगवेगळ्या दोन इन्स्टा आयडीवरून प्रसारित केले. त्यामुळे संगनमत करून १४ वर्षीय तरुणीची बदनामी करून तिचे मानसिक खच्चीकरण केल्याची बाब तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मंगळवारी (ता. २१)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR