17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्र२०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित

२०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित

सातारा : मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकालाचा परिणाम २०२४ मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साता-यात बोलत होते. सध्या तरी मोदींना अनुकूल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, आजच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेण्ड सध्या दिसतोय हे मान्य केले पाहिजे. मंगळवारी ६ वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएमला दोष देता येणार नाही. मंगळवारी ६ वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.

शरद पवार म्हणाले, बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. राहुल गांधींच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे. राहुल गांधींच्या निकालानंतर विजयाची खात्री होती. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. नवीन लोकांना संधी द्यावी असा ट्रेण्ड दिसत आहे. राहुल गांधींची हैदराबादला सभा झाली तिथे आता संध्याकाळी ५ नंतर चित्र स्पष्ट होईल. मी निवडणूक प्रचारात सहभागी नव्हतो. दिल्लीत बैठक होणार आहे त्यानंतर या विषयी बोलणार आहे .

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
शरद पवार म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देत असताना दुस-याच्या ताटातील देता कामा नये अशी सर्वांची भूमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. कुणाच्या ताटातून न देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संसदेत जाऊन काही गोष्टी करायला हव्या आहेत. अधिवेशनात या संदर्भात काय होते याकडे लक्ष आहे.

मराठा आरक्षणामुळे अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष
मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होते हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR