25.3 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeसोलापूरसंभाजी आरमारचे धरणे आंदोलन

संभाजी आरमारचे धरणे आंदोलन

सोलापूर : मागील अनेक वर्षापासून शासनाने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंध लादल्याने लाखो मिळकतधारक अडचणीत अडकले आहेत. तरी या लाखो मिळकतधारकांची अडचणीतून मुक्तता करण्यासाठी सरकारने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहाराला परवानगी द्यावी या मागणीसाठी संभाजी आरमारने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोलापूर शहर परिसरातील विशेषत: हद्दवाढ भागातील जवळपास नव्वद टक्क्याहुन जास्त मिळकती गुंठेवारीच्या आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून सरकारने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत. सरकारनेच गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहाराला मान्यता दिल्याने नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत आणि आता अशाप्रकारे गुंठेवारी मिळकतीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतधारकांवर अन्याय केला जात आहे. गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असल्यामुळे हजारो नागरिक मिळकत विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

आरोग्य, शिक्षण, घरगुती अडचणी निवारण्यासाठी स्वमालकीची मिळकत असूनही विक्री करता येत नसल्याने अनेकांना खासगी सावकारीचा आधार घ्यावा लागत आहे. जनतेच्या मूलभूत हक्कावर ही एकप्रकारे सरकारने आणलेली गदाच आहे. सोबतच असे व्यवहार नोंदणी थांबवून कोट्यवधींच्या सरकारी महसुलाचे देखील नुकसान झाले आहे. लाखो मिळकती कवडीमोल किंमतीच्या होत असून अडचणी निवारण्यासाठी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव नोटरी व्यवहाराने अत्यल्प किंमतीत या मिळकती विक्री होत आहेत.

सरकारने याप्रश्नी तात्काळ लक्ष घालून गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर लादलेले निर्बंध हटविणे गरजेचे आहे. येत्या अधिवेशन काळात या गंभीर प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी आरमारने हे आंदोलन केले. यापूर्वी देखील तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना संघटनेने निवेदन दिले आहे. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, प्रवक्ता मनीष काळे, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, उपशहरप्रमुख राज जगताप, रेवणसिद्ध कोळी, महिला आघाडी प्रमुख रेखाताई व्हनखडे, रिक्षा संघटना शहरप्रमुख शोभाताई घंटे, विद्यार्थीप्रमुख सोमनाथ मस्के, महेश घोडके, अविनाश विटकर, प्रवीण मोरे, आण्णा वाघमोडे, सुधाकर करणकोट, संतोष कदम, प्रदीप मोरे, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR