हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा; शेती पडीक राहण्याची भीती

हिंगोली (आय. डी. पठाण) : खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. हिंगोली-वाशीम रस्ता आणि गोरेगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा लावल्या आहेत. डिझेल अभावी शेतीची मशागत आणि इतर कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, वेळेत इंधन न मिळाल्यास यंदा शेतकऱ्यांची जमीन पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

पेट्रोल पंपांवर रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-वाशीम रस्त्यावरील कळगाव पाठीच्या पुढे असलेल्या भन्साळी पेट्रोल पंपावर डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या रांगा लावल्या. अशीच विदारक परिस्थिती गोरेगाव येथेही पाहायला मिळाली. गोरेगाव येथील संत नामदेव पेट्रोल पंपावर शेतीच्या कामासाठी डिझेल भरण्याकरिता रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १०० ते १२५ ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संत नामदेव पेट्रोल पंपापासून ते थेट जिजामाता चौफुलीपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेतकरी अडचणीत; यंदा शेती पडीक पडणार?
पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा वेळी शेतीची नांगरणी, कोळपणी आणि मशागतीची कामे करण्यासाठी डिझेलची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, पंपांवर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. “शेतीची कामे ऐन रंगात आली असताना डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल पंपांवर तासन् तास उभे राहावे लागत आहे. जर डिझेल वेळेवर मिळाले नाही, तर यंदा शेतीची कामे खोळंबून जमीन पडीक पडण्याची वेळ आमच्यावर येईल.” प्रशासनाने या इंधन तुटवड्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news