26.8 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeसोलापूरसोलापूरच्या राजकारणात भूकंप; अपक्षाला काँग्रेसचा पाठिंबा

सोलापूरच्या राजकारणात भूकंप; अपक्षाला काँग्रेसचा पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत आले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी माध्यमांना जाहीरपणे माहिती देताना सांगितले की, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

शिवसेनेने गडबड केली आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ स्वत:कडे ठेवला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी स्पष्टपणे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील हे मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले आहेत.

दक्षिण सोलापूर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसने महाविकास आघाडीच्या बैठकीत मागितला होता. परंतु शिवसेनेने गडबड केली आणि हा मतदार संघ स्वत:कडे ठेवला. अमर पाटील हे शिवसेनेकडून (उबाठा) निवडणूक लढवत आहेत.

अमर पाटील यांचे वडील रातीकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार म्हणून दक्षिण सोलापूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. सुशीलकुमार शिंदे यांनी पुढे बोलताना सांगितले की,आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत हे सगळं निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीरपणे सांगितलं आहे.

२० नोव्हेंबर रोजी सकाळी नेहरू नगर येथील मतदान केंद्रावर सुशीलकुमार शिंदे आणि खा.प्रणिती शिंदेंबरोबर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी उपस्थित होते. अपक्ष उमेदवाराला पांिठबा दिल्याने शिवसेना उबाठा गटाला जबर धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांची दक्षिण सोलापुरात सभा झाली होती. अमर पाटील यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे सोलापुरात आले होते. भाषण करताना उद्धव ठाकरेंनी खा.प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते. प्रणिती शिंदेंना आवाहन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR