लडाख : लडाखमध्ये शनिवारी आठ तासांत दोनदा भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, पहिला भूकंप सकाळी ८.२५ वाजता झाला, ज्याची तीव्रता ३.४ इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र ३५.४४ अंश अक्षांश आणि ७७.३६ अंश रेखांशावर पृष्ठभागापासून १० किमी खाली होते.
दुसरा भूकंप दुपारी ४.२९ वाजता झाला. त्याची तीव्रता ३.७ होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू ३५.२३ अंश अक्षांश आणि ७७.५९ अंश रेखांश पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खोलीवर होता. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की केंद्रशासित प्रदेशात कोठेही नुकसान झाले नाही.