33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाकोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय

कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. केकेआरने हा विजय मिळवून १२ गुणांसह दुस-या स्थानावरील पकड मजबूत केली. शिवाय त्यांनी नेट रन रेटही ( ०.९७२ ते १.०९६ असा) प्रचंड सुधारून अन्य संघांवर दडपण निर्माण केले आहे. ऊउ ला मात्र ११ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागल्याने प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित ३ सामन्यांत विजय मळवणे गरजेचे झाले आहे.

नाणेफेक जिंकून दिल्लीने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ङङफ च्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. पृथ्वी शॉ ( १३), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( १२), अभिषेक पोरेल ( १८), शे होप ( ५) यांना वैभव अरोरा ( २ विकेट्स), मिचेल स्टार्क व हर्षित राणा यांनी माघारी पाठवले. रिषभ व अक्षर पटेल ( १५) यांच्यावर भीस्त होती, परंतु वेंकटेश अय्यरने फिरकीवर दिल्लीला अडकवले. त्याने चार षटकांत १६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. रिषभ २७ धावांवर माघारी परतला. सुनील नरीन यानेही ४ षटकांत २४ धावांत १ विकेट मिळवली. असे असताना कुलदीप यादव मैदानावर उभा राहिला आणि नाबाद ३५ धावा करून दिल्लीला ९ बाद १५३ धावांपर्यंत पोहोचवले. हर्षित राणानेही दोन विकेट्स घेतल्या.

दिल्लीच्या फलंदाजांची जशी अवस्था झाली होती, त्याउलट कोलकाताच्या सलामीच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करून दाखवली. फिल सॉल्ट आक्रमक पविर्त्यात होता, तर सुनील नरीनने सावध खेळ करून त्याला उत्तम साथ दिली. सॉल्टने २६ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. केकेआरने ७९ धावांवर पहिली विकेट गमावली. नरीने १५ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. ंिरकू सिंगला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवून ङङफ ने चांगला डाव खेळला. अक्षरने गोळीच्या वेगाने चेंडू टाकून सॉल्टचा त्रिफळा उडवला. सॉल्ट ३३ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांसह आपले काम करून गेला. रिंकूला ११ धावांवर माघारी जावे लागले.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी केकेआरला ट्रॅकवर ठेवले. अय्यरने आज आयपीएलमध्ये ३००० धावांचा ( १०९ इनिंग्ज) टप्पा ओलांडला. सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडणा-या फलंदाजांमध्ये अय्यर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा व शिखर धवनसह संयुक्त राहिला. गौतम गंभीर व विराट कोहली ( ११० इनिंग्ज) यांना त्याने मागे टाकले. श्रेयस व वेंकटेश यांनी ४० चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. ङङफ ने १६.३ षटकांत ३ बाद १५७ धावा करून विजय पक्का केला. वेंकटेश २६, तर श्रेयस ३१ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR